Premium|Parenthood: पायलच्या धाडसाची कहाणी; डाऊन सिंड्रोम असलेल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय

Emotional and ethical dilemma : आपल्याला बाळ हवं होतं, ते आपल्याला मिळतंय. कदाचित हे बाळ आपल्या अपेक्षेप्रमाणे नसेलही, पण..
indian pregnanat  mother and father

indian pregnanat mother and father

Esakal

Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

खिडकीतून आलेल्या सोनेरी किरणांनी दुसरा दिवस उजाडला. जाग आली तरी ती अंथरुणातच पडून राहिली. तिच्या मनात विचार डोकावला... बाळाला जन्म द्यायचा की नाही हे ठरवण्याआधी आपल्यासारखी परिस्थिती आलेल्या लोकांना भेटायला हवं. त्यांनी काय केलं, हे विचारायला हवं. त्यांना कुणी मदत केली का, हे पाहायला हवं. ही मुलं मोठी झाल्यावर काय काय करू शकतात, याची चाचपणी करायला हवी.

अर्धा तास झाला होता त्यांना तिथं बसून, पण एवढ्या वेळात ते एकमेकांशी एकही शब्द बोलले नव्हते. मध्येच पायलनं दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा झाकून घेतला. सुश्रुतनं तिच्याकडं मान वळवून पाहिलं आणि तिच्या माथ्यावर हातानं थोपटलं. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निर्मला चिपळूणकरांच्या दवाखान्याच्या वेटिंग रूममध्ये पायल आणि सुश्रुत बसले होते. पस्तीस वर्षांची पायल एका आयटी कंपनीमध्ये उच्च पदावर होती आणि तिचा एकोणचाळीस वर्षांचा पती सुश्रुत एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत इंजिनिअर होता. दोघांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव होते.

आपल्या संसारवेलीवर एक गोंडस फूल हवं म्हणून गेली पाच वर्षं त्या दोघांनी अनेक प्रसूती तज्ज्ञांच्या हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले होते. दोघांच्याही तपासणीत कुठल्याच डॉक्टरांना कोणताच दोष सापडत नव्हता. दिवस राहण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दोघांनी पाळायच्या सगळ्या गोष्टी ते पाळत होते. दिलेली सगळी औषधं, इंजेक्शन्स वेळेवर घेण्यात त्यांनी कधीच कुचराई केली नव्हती. सगळ्या प्रोसिजर्स झाल्या, तरी कशालाच यश येत नव्हतं. शेवटी मागच्या वर्षी त्यांनी शहरातल्या नामांकित वंध्यत्व चिकित्सक डॉ. निर्मला चिपळूणकरांचा दरवाजा ठोठावला.

दोन आठवड्यांपूर्वी डॉ. चिपळूणकरांनी पायलचं तिसऱ्यांदा आयव्हीएफ केलं आणि तो प्रयत्न मात्र यशस्वी झाला... अखेर पायल आई होणार होती! पायलच्या गर्भाशयात आरोपण करण्यापूर्वी डॉक्टरांनी फलित झालेल्या गर्भाची जनुकीय तपासणी केली होती. आज दोन आठवड्यांनी त्या तपासणीचा निष्कर्ष मिळणार होता. त्यासाठीच त्या दोघांना भेटायला बोलावलं होतं. डॉक्टर काय सांगतील, हा विचार पायल करत होती. आपले तळहात ओलसर झाल्याचं आणि तोंडाला कोरड पडल्याचं तिला जाणवलं. पर्समधला पेपर नॅपकिन काढून तिनं कपाळावरचा घाम पुसला. कानात इअरफोन घातलेल्या सुश्रुतचे मात्र, एकामागून एक फोन सुरू होते. त्याचा चेहरा निर्विकार होता. पण अधूनमधून तो खास ट्रिम केलेल्या त्याच्या दाढीवरून हात फिरवत होता. वेटिंग रूममध्ये एसी असूनही त्याच्या कानशिलांवर घामाचे थेंब तरळत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com