Premium|Diamand: प्रयोगशाळेत हिरा कसा तयार करतात..? जाणून घेऊया हिरे व्यापारी प्रवीण सोनी यांच्याकडून

Lab-grown diamonds: नैसर्गिक हिरा आणि प्रयोगशाळेतील हिरा यामध्ये काय फरक असतो..?
Lab grown diamonds

Lab grown diamonds

Esakal

Updated on

प्रवीण सोनी

हिरा म्हणजे निसर्गाचा शाश्वत वारसा, पण आज तो मानवी बुद्धिमत्तेचं द्योतकही ठरत आहे. पृथ्वीला लाखो वर्षं लागणारी प्रक्रिया विज्ञानाने काही आठवड्यांत साध्य केली. त्यातून प्रयोगशाळेत जन्माला आलेले हिरे सौंदर्य, टिकाऊपणा आणि शाश्वततेचा आधुनिक संगम दर्शवतात.

हिरा म्हटलं की आपल्या मनाच्या पडद्यावर पहिल्यांदा उमटतं ते त्याचं अद्वितीय तेज. पारदर्शकतेतून आरपार जाणारा सूर्यकिरण जसा इंद्रधनुष्याची जादू निर्माण करतो, तसा हिऱ्याचा प्रत्येक पैलू आपल्या डोळ्यांना मोहवतो. हातात धरलेला हिरा फक्त दगड नसतो, तर तो शाश्वततेची, निरंतरतेची आणि प्रेमाच्या अपराजेय नात्याची परिपूर्ण संकल्पना असतो. ते असतं क्षणांचं स्मरण करून देणारं, पिढ्यान्‌पिढ्या वारसा जपणारं, जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांना अजरामर करणारं सर्वात मौल्यवान रत्न.

पृथ्वीच्या गर्भात हजारो-लाखो वर्षं अपार दाब आणि असह्य उष्णता सहन करून जन्म घेणारा हा खडा म्हणजे निसर्गाची किमया. प्रत्येक नैसर्गिक हिऱ्यामागे पृथ्वीने लिहिलेली एक विलक्षण कथा असते. ही कथा असते धीराची, सहनशीलतेची आणि उत्कट सौंदर्याची! म्हणूनच तो मानवाला आदिकाळापासून मोहवतो, आकर्षित करतो आणि आपल्या चमचमत्या रूपानं आपलं अस्तित्व अधोरेखित करतो. मात्र मानवी बुद्धिमत्तेला नुसतं कौतुक पुरेसं वाटत नाही; ती नेहमी नवनिर्मितीचा मार्ग शोधते. हिऱ्याच्या बाबतीतही तेच घडले. हिरा आता केवळ पृथ्वीच्या उदरातच जन्म घेत नाही, तर तो प्रयोगशाळेच्या उपकरणांमधूनही साकारला जातो. अत्याधुनिक उपकरणांच्या सूक्ष्म प्रयोगांतून, संशोधकांच्या चिकाटीतून आणि तंत्रज्ञानाच्या अचूकतेतून जन्माला आला ‘लॅबोरेटरी ग्रोन डायमंड’.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com