Premium|World Cup Football 2026 : फुटबॉलचे मैदान सज्ज!

FIFA World Cup teams : फुटबॉल विश्‍वकरंडकात ४८ संघांची चुरस रंगणार असून इटली सलग तिसऱ्यांदा अपात्र ठरल्याने खळबळ उडाली आहे. चेकिया, तुर्किएचे पुनरागमन आणि चार देशांच्या पदार्पणामुळे आगामी स्पर्धेची व्याप्ती वाढली असून आफ्रिकेनेही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
FIFA World Cup teams

FIFA World Cup teams

esakal

Updated on

किशोर पेटकर

चेकिया (चेक प्रजासत्ताक) वीस वर्षांनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेत दाखल झाला आहे. हा संघ शेवटचा २००६मध्ये जर्मनीत खेळला होता. तुर्किएने २४ वर्षांनंतर पात्रता मिळविण्यात यश मिळविले. यावेळी चार देश विश्‍वकरंडक फुटबॉल मैदानावर पदार्पण करतील. यामध्ये केप (काबो) व्हेर्द, कुरासाव, जॉर्डन व उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.

अमेरिका-मेक्सिको-कॅनडात  संयुक्तपणे ११ जून ते १९ जुलै या कालावधीत होणाऱ्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील सर्व ४८ संघ निश्चित झाले आहेत.  प्रथमच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या झगमगत्या मैदानात ४८ देशांचे संघ खेळताना दिसतील. चार वर्षांपूर्वीपर्यंत ३२ देशांत चुरस होती, आता स्पर्धेची व्याप्ती वाढली असून आफ्रिकेतील फुटबॉलची ताकदही दिसून आली आहे. स्पर्धेत युरोपातील सर्वाधिक म्हणजे १६ देश पात्र ठरले आहेत, त्याखालोखाल आफ्रिकेतील १० देश आहेत. आशियातील पात्र देशांच्या संख्येतही नऊपर्यंत वाढ झाली आहे. अमेरिका-मध्य अमेरिका (कॉन्कॅकॅफ) क्षेत्रातील आणि दक्षिण अमेरिकेतील (कॉन्मेबोल) प्रत्येकी सहा देश आहेत. न्यूझीलंड हा एकमेव देश ओशनिया विभागातील आहे.

FIFA World Cup teams
India Team Travel Distance : मायदेशातच ‘वर्ल्डकप पर्यटन’
Loading content, please wait...

Related Stories

SAFF Women Football
India vs Pakistan
FIFA World Cup 2026
Graham Arnold Iraq Coach Success
Marathi News Esakal
www.esakal.com