

Child Psychology and Development
esakal
वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपर्यंत मुलांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख पटू लागलेली असते. स्वतःचे विचार, स्वतःच्या गरजा समजू लागतात आणि त्यातून अनेक प्रश्नही पडतात. त्या प्रश्नांची उत्तरे बऱ्याचवेळा आई-बाबांकडेही नसतात. म्हणूनच कदाचित आठव्या वर्षी गुरुगृही पाठवायची प्रथा सुरू झाली असावी.
शिशुवय संपता संपता म्हणजे साधारणतः पाच-सहा वर्षांच्या मुलांचा मेंदू मोठ्यांच्या मेंदूच्या ८० ते ९० टक्के आकाराचा झालेला असतो. पण गंमत म्हणजे त्यांना तेवढी समज मात्र नसते! अजूनही ती मुले आपले तेच खरे करणारी, चुरूचुरू बोलणारी, आई-बाबांना आपल्या तालावर नाचवणारी असतात. एव्हाना मुलांना नैसर्गिक विधींवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येऊ लागलेले असते. शिशुशाळेत खेळ आणि अभ्यासही सुरू झालेला असतो. या वयापासून दहा-बारा वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूत काय चाललेले असते यावर आज विचार करूयात.