

Goa tourism corruption
esakal
गोव्याच्या उत्सवी भावनेला छेद देत उत्तर गोव्यातील हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबला लागलेल्या भीषण आगीत पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला. किनारी प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन करून, पंचायत सदस्य, अधिकाऱ्यांना विकत घेऊन उभे राहिलेले बेकायदा बांधकाम दुर्घटनेचे मूळ ठरले. क्लबमध्ये गेलेले लोक सरकारच्या बेमुर्वतखोर व निष्काळजी वर्तनाचे बळी ठरले. ‘त्या’ एका घटनेने सरकारी यंत्रणेचे ‘पोस्टमार्टेम’ केले आणि गोव्यातील भ्रष्टाचाराने काळवंडलेल्या पर्यटनाचा भेसूर चेहरा उघड केला. दुर्घटनेला आठ दिवस उलटले; पण सुशेगाद गोव्याला मृत्यूचे पातक आणि भ्रष्टाचाराच्या नवनवीन प्रकरणांचा दुहेरी धक्का पचवता आलेला नाही. गोव्यातील ‘बेबंदशाही’चा हा लेखाजोखा..