

Indian Rock-cut Architecture
esakal
अमोघ वैद्य
मुख्य मंदिराच्या उत्तरेकडच्या भिंतीवर महाभारताचं महायुद्ध एखाद्या जिवंत पटासारखं उलगडतं. युद्ध करणारा अर्जुन असो, चक्रव्यूहात झुंजणारा वीर अभिमन्यू असो किंवा गदा उगारून दुर्योधनाचा पाठलाग करणारा भीम; या सर्वांचे सर्व प्रसंग पाषाणात कोरलेले असूनही आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा भास होतो. महाभारत संपल्यानंतरचे हरिवंश म्हणजेच श्रीकृष्णाच्या बाललीलांची शिल्पं आपल्याला वृंदावनात घेऊन जातात. वेरूळच्या पाषाणी महाकाव्यात रामायणाचीही गाथा एखाद्या जिवंत चित्रपटासारखी उलगडते.
एलापुराचलगताद्भुतसन्निवेशं यद्वीक्ष्य विस्मितविमानचरामरेन्द्राः । एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री-दृष्टे दृशन्ति सततं बहु चर्चयन्ति । भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् । कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी तन्नाम कीर्तनमकार्यत येन राज्ञा।
बडोदे येथे सापडलेल्या राष्ट्रकूटवंशीय राजा कर्क (दुसरा) याच्या शके ७३४मधल्या ताम्रपटातला हा भाग.