Premium|Schleichera oleosa Kusum tree Marathi : रंग माझा वेगळा

Plant Pigments and Photosynthesis : निसर्गातील रंगांचे विज्ञान उलगडताना लेखक कोशिंब वृक्षाच्या तांबूस पालवीचे महत्त्व अधोरेखित करतात. कोवळ्या पानांमधील अँथोसायानिन हे रंगद्रव्य सूर्याच्या अतिनील किरणांपासून आणि कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक 'सनस्क्रीन' व 'ढाल' म्हणून कार्य करते.
Plant Pigments and Photosynthesis

Plant Pigments and Photosynthesis

esakal

Updated on

डॉ. मंदार दातार

कोवळ्या पानांना रंग देण्याच्या या रंगोत्सवातला पिकासोचा मान मिळेल वृक्षराज कुसुम, कुसुंब किंवा कोशिंब याला. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोशिंबाची पाने पिवळी होऊन गळतात. मार्चच्या सुरुवातीला कोशिंबाचे झाड तांबूस-ताम्रवर्णी रंगांची नवी पालवी धारण करतात आणि या झाडाची खरी ओळख पटते. खरेतर कोशिंब मिरवत असलेल्या या तांबड्याच्या एका छटेला ‘कुसुंबी रंग’ असेच नाव आहे.

आपल्या दृष्टीला खरा अर्थ प्राप्त होतो रंगांमुळेच. रंगहीन गोष्टींना आपण अगदी सहज ‘नीरस’ असा शिक्का मारून मोकळे होतो. आपल्या आजच्या कारखान्यांच्या, बाजारपेठेच्या युगात आपल्या भवताली मानवनिर्मित रंगांची रेलचेल असली, तरी आपल्या डोळ्यांना सुखावतात ते निसर्गनिर्मित रंगच. अगदी आकाश-पाण्याच्या निळ्या, खडक मातीच्या तपकिरी-काळ्या रंगापासून वनस्पतींच्या, फुलांच्या, पानांच्या, फळांच्या, पशू-पक्ष्यांच्या आणि कीटक, फुलपाखरांच्या बहुविध रंगांपर्यंत. पण ठरावीक साचेबद्ध रंग पाहायची सवय असणाऱ्यांना निसर्ग कधीकधी आश्चर्यचकित करू शकतो. विशेषतः वनस्पतींच्या पानामध्ये जिथे आपण केवळ हिरव्या रंगाची अपेक्षा करतो, तिथेच निसर्ग कधीकधी लाल-पिवळ्या रंगांची उधळण करतो. तेव्हा आजची ही कथा आहे अशाच एका अनपेक्षित रंगाची... पानांमधल्या एका वेगळ्या आविष्काराची.

Plant Pigments and Photosynthesis
Premium|Fragrance and Memories : गंध आठवणींचा; साजूक तुपाच्या वासापासून ते पावसाच्या मृदगंधापर्यंतचा एक हळवा प्रवास!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com