

Nagar Parishad Election Results
esakal
नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. जनतेने भरभरून मते देत नव्या सदस्यांना संधी दिली. प्रशासकराज संपून पुन्हा जनतेच्या हाती सत्ता आली आहे. जनतेने दिलेला कौल काय आहे याचा प्रत्येक पक्षाने पुढील वाटचालीसाठी विचार करायला हवा ...
अखेर न. . च्या लग्नाला ... म्हणतात तशी सतरा विघ्न पार करत राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. अनेक वर्षांच्या प्रशासकराजला पूर्णविराम देत लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, हेच या निवडणुकांचे महत्त्वाचे फलित समजायला हवे! २१ डिसेंबरला २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषद / नगर पंचायतींच्या (एकूण २८८) मतमोजणीमुळे सुमारे पाच ते तीन वर्षांच्या प्रशासक राजला पूर्णविराम मिळाला. राज्यात स्थानिक पातळीवर लोकशाहीची पुनर्स्थापना झाली असे म्हणायला हवे. हे निकाल देखील न्यायालयांच्या निर्णयाला आधीन राहून देण्यात आले आहेत हे देखील विसरता कामा नये!
या निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाचा वाद अगदी राज्य निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही इतर मागास प्रवर्ग आरक्षणाच्या मुद्यावर (ओबीसी) या ‘निवडणूक प्रक्रियेची चिवडणूक’ होते की काय? अशी स्थिती झाली होती. त्यातच ‘व्होटचोरी’च्या मुद्यावरही मतदार याद्यांच्या शुद्धीवर प्रश्नचिन्ह असताना या निवडणुका निर्विघ्नपणे होणार की नाही? असा पेच निर्माण झाला होता. कदाचित इतिहासात प्रथमच निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उच्च न्यायालयांकडून या निवडणूक कार्यक्रमामध्ये हस्तक्षेप करत मतमोजणीची तारीख लांबविण्यात आली हे देखील या निवडणुकांचे वैशिष्ट्य सांगता येते!