

Himalayan Trekking Adventure
esakal
खडतर आव्हाने पार करत आम्ही मार्गक्रमण करत होतो. अखेरीस आमचे अंतिम ठिकाण असलेले पाच-सहा छोटे तलाव आम्हाला दिसू लागले. अतिशय स्वच्छ पाण्यामुळे तळे अगदी नितळ दिसत होते. आता आम्ही १३ हजार २०० फुटांवर आलो होतो. भरपूर छायाचित्रे घेतली आणि थोड्या वेळाने परत निघालो. परतताना तेच प्रवाह ओलांडायचे होते.
हिमाचल प्रदेशात लाहौलच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये पसरलेली मियार व्हॅली. मियार नदीचा स्रोत असलेली मियार हिमनदी याच व्हॅलीमध्ये आहे. या मियार व्हॅलीचा ट्रेक मी आणि माझा मुलगा श्रीयांसने करायचे ठरवले. नऊ ऑगस्टला पुण्याहून चंडीगढचे विमान पकडले. चंडीगढहून टॅक्सीने मनालीला जायला निघालो. मंडीपर्यंतचा प्रवास सुरळीत झाला. तिथून पुढे मात्र अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला होता. पण सतत जेसीबी वापरून दगड हटवायचे काम सुरू होते, त्यामुळे दोन-चार तास उशिराने का होईना, संध्याकाळपर्यंत मनालीला पोहोचलो.