
जागृती कुलकर्णी
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावमध्ये राहणारे डॉ. राजेंद्र गोसावी हे नाव फक्त मानवी रुग्णांपुरतं मर्यादित नाही. एमबीबीएस आणि एमएस झाल्यानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेनं अनेक रुग्णांना नवजीवन दिलं. पण त्यांची वैद्यकीय सेवा केवळ हॉस्पिटलपुरतीच मर्यादित राहिली नाही... ती विस्तारली झाडं, साप, पक्षी, प्राणी आणि जंगलातल्या मुक्या जिवांपर्यंत...