

John Winthrop
esakal
विन्थ्रॉपने इंग्लंडमधून अमेरिका खंडाकडे प्रस्थान ठेवले ते आर्बेला नावाच्या जहाजातून. या जहाजातील आपल्या सहकाऱ्यांबरोबर, खलाश्यांबरोबर व प्रवाशांबरोबर त्याने जो संवाद साधला, त्याला गंभीर व पवित्र अशा जणू एका प्रवचनाचा दर्जा प्राप्त झाला, की जे उद्धृत करावे असे केनेडी, रेगन आणि ओबामा या राष्ट्राध्यक्षांना वाटावे.
युरोपच्या इतिहासात स्वायत्त राष्ट्र-राज्यांच्या (Nation State) निर्मितीमधील मुख्य अडसर पोपच्या धर्मसत्तेचा होता. पोप म्हणजे अर्थातच रोमन कॅथलिक धर्मव्यवस्थेचा प्रमुख. जोपर्यंत त्याचे स्थान डळमळीत केले जात नाही तोपर्यंत राष्ट्र-राज्यांना स्वायत्त सत्ताकेंद्रे होता येणार नव्हते, हे अगदीच स्पष्ट आहे. मात्र त्यासाठी एखाद्या राष्ट्राने किंवा राजसत्तेने पुढाकार घेऊन सरळ-सरळ चर्चवर हल्ला करून ते ताब्यात घेणे अशक्यप्राय होते. थोडक्यात पोप म्हणजे असून अडचण नसून खोळंबा, अशी या राष्ट्रांची म्हणजे राष्ट्रप्रमुख सत्ताधिशांची, राजांची अवस्था होती.