कामिल पारखे
आजकाल जगभर ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिलेला नाही. हल्ली विविध शाळांत, उद्योगांत, कंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहाने साजरा होतो.
स्ती धर्मात ख्रिसमस किंवा नाताळ, लेंट सीझन किंवा उपवासकाळ, होली वीक, गुड फ्रायडे, ईस्टर हे सर्वांत महत्त्वाचे सण आहेत. जगभरचे ख्रिस्ती धर्मीय आपापल्या स्थानिक संस्कृतींची आणि परंपरांची त्यात भर घालून हे सण साजरे करतात. महाराष्ट्रातील बहुसंस्कृतीचे वरदान लाभलेला ख्रिस्ती समाजही त्यास अपवाद नाही.