Premium|NRI Retirement Planning India : आपण मुलांकडून काय अपेक्षा ठेवायची? निवृत्तीनंतरच्या 'उत्तरायणा'चा शोध घेणारा अंतर्मुख करणारा लेख

Cultural Belonging in Old Age : अमेरिकेतील सुखवस्तू आयुष्य सोडून निवृत्तीनंतर भारतात स्वतःचे 'उत्तरायण' शोधणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या मानसिकतेचा आणि वाढत्या वयातील सांस्कृतिक जवळीकीच्या शोधाचा वेध घेणारा एक अंतर्मुख करणारा विशेष लेख.
NRI Retirement Planning India

NRI Retirement Planning India

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

आपण आपल्या आई-वडिलांचं काही करू शकत नाही, मग आपल्याला आपल्या मुलाकडून तरी अपेक्षा करण्याचा काय अधिकार आहे? हा प्रश्‍न अंतर्मुख करणारा होता. त्यानं भारतातलं वार्धक्य पाहिलं नव्हतं, तसं अमेरिकेतलं वार्धक्यसुद्धा फारसं जवळून पाहिलं नव्हतं. पण त्याचं स्वतःचं वार्धक्य मात्र दरदिवशी जवळजवळ येत चाललं होतं...

मागच्या लेखात (द इव्हिनिंग ग्लोरी, ता. १६ मे) मी ‘आभा’ म्हणजे भारतीय जीवनशैलीच्या निवृत्त वसाहतीबद्दल लिहिलं होतं. त्याचं उगमस्थान अमेरिकी भारतीयांच्या इतिहासाइतकंच जुनं.

अमेरिकेतील कायम व्हिसाचे नियम बदलल्याने १९७०नंतर भारतीयांचा अमेरिकेत येण्याचा ओघ वाढला. कारण त्यानंतर पंधरा वर्षांनी बृहन्महाराष्ट्र मंडळासारखे उपक्रम मराठी आणि अन्य भारतीय समाजात सुरू झाले. त्यांच्या अधिवेशनात निवृत्ती नियोजन हा एक विषय असे. त्यानंतर गावोगावी मित्रांच्या गप्पांमध्ये हे विषय येत असत.

खूप लोकांना वाटे, ‘आपण पाच वर्षांनी परत भारतात जाणार आणि आपल्या वडिलोपार्जित ‘उत्तरायण’ बदल्यात आरामात राहणार, तेव्हा विचार कशाला करायचा?’ ‘अहो, कशाला हवी आपल्याला निवृत्तांची वसाहत? आम्ही तर बाई, आमच्या थोरल्या मुलाकडेच जाऊन राहणार आहोत,’ असं म्हणणाऱ्या लोकांना लवकरच समजलं, की ‘हे भलते अवघड आहे’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com