Permium|Custard Pudding Recipes : अरेबियन चव आता भारतीय स्टाईलमध्ये! घरीच बनवा मऊ आणि क्रिमी 'कुनाफा पुडिंग'

Homemade Arab Desserts : कस्टर्ड आणि शेवयांचा वापर करून बनवलेले कुनाफा पुडिंग, टोस्ट पुडिंग आणि क्रिमी केक अशा फ्युजन मिष्टान्नांच्या खास पाककृती.
Custard Pudding Recipes

Custard Pudding Recipes

esakal

Updated on

इंडियन स्टाइल अरेबियन

कुनाफा पुडिंग

साहित्य

दोन कप दूध, २ टेबलस्पून कस्टर्ड पावडर, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, २ टेबलस्पून साखर, २ ते ३ थेंब व्हॅनिला इसेन्स, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स व गुलाबाच्या पाकळ्या, १०० ग्रॅम बारीक शेवया, १ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून पिठीसाखर,

१ टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून पाणी.

कृती

एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करावे. एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, कस्टर्ड व अर्धा कप दूध मिक्स करून बाजूला ठेवावे. ड्रायफ्रूट्सचे तुकडे करावेत. एका नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया २ मिनिटे भाजून घ्याव्यात. मग त्यामध्ये पाणी घालून त्यात पिठीसाखर व वेलची पूड घालावी. मिक्स करून घ्यावे आणि बाजूला ठेवावे. दूध गरम झाले, की त्यामध्ये साखर विरघळवून घ्यावी. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर व कस्टर्डचे मिश्रण घालून नीट मिक्स करून थोडे घट्टसर होईपर्यंत मंद विस्तवावर गरम करावे. मिश्रण घट्ट झाले की थंड करावे. आता शेवयांचे तीन भाग करावेत. एका ट्रेमध्ये प्रथम शेवयांचा थर लावून त्यावर कस्टर्डचे निम्मे मिश्रण घालावे. त्यावर परत शेवयांचा थर देऊन परत राहिलेले कस्टर्ड घालावे. परत त्यावर राहिलेला शेवयांचा थर लावावा आणि त्यावर ड्रायफ्रूट्सने सजवून गुलाबाच्या पाकळ्या पसराव्यात. दोन ते तीन तास हे डिझर्ट फ्रीजमध्ये सेट करावे. पुडिंग थंडगार सर्व्ह करावे.

Custard Pudding Recipes
Premium|Winter Fruit Desserts : थंडीच्या दिवसांत फळांच्या खास स्वीट डिशेसने वाढवा जिभेची चव!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com