

Winter Fruit Desserts
esakal
कॅरट पुडिंग
वाढप - ८ व्यक्तींसाठी
साहित्य
अर्धा कप लोणी, २०० ग्रॅम ब्राऊन शुगर, २५० ग्रॅम गाजरे, १ मोठे सफरचंद, १५० ग्रॅम मैदा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लवंग - दालचिनी - जायफळ यांची एकत्रित पूड, ५० ग्रॅम बेदाणे, ३ चमचे बेकिंग पावडर.
कृती
मैदा, मीठ, बेकिंग पावडर आणि मसाल्याची पूड एकत्र चाळून घ्यावे. बेदाणे थोड्या मैद्यात घोळवून घ्यावेत. गाजर, सफरचंद जाड किसणीवर किसावे. लोणी व साखर एकत्र फेसून घ्यावे. त्यात किसलेले गाजर आणि सफरचंद घालावे. नंतर मैद्याचे मिश्रण आणि बेदाणे घालून हलक्या हाताने मिसळावे. डब्याला किंवा मोल्डला तुपाचा हात फिरवून त्यात तयार मिश्रण भरावे. मोल्ड बटर पेपरने झाकून दोऱ्याने बांधावा आणि कुकरमध्ये शिट्टी न लावता दीड तास वाफवावा. सर्व्ह करताना पुडिंग गरमच असावे आणि बरोबर व्हॅनिला आइस्क्रीम किंवा फ्रेश क्रीम द्यावे.