

Indian Sweets and Desserts
esakal
वाढप - ६ ते ७ व्यक्तींसाठी
साहित्य - एक वाटी बिया काढलेले खजूर, अर्धी वाटी डिंक, १ वाटी बदाम, १ वाटी काजू, १ वाटी तूप.
कृती
सर्वप्रथम खजुराचे बारीक तुकडे करावेत. मंद गॅसवर तुपामध्ये हे तुकडे मऊ होईपर्यंत परतावेत. डिंक रवाळ कुटून तुपात तळून घ्यावा. काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करून तेही तुपात तळून घ्यावेत. आता हे सर्व जिन्नस परातीत घेऊन एकजीव करावेत. या मिश्रणाचे जाड रोल करावेत व हे रोल फ्रीजमध्ये दोन तास सेट होण्यासाठी ठेवावेत. सेट झाल्यानंतर या रोलच्या साधारण अर्धा इंचाच्या चकत्या कराव्यात. खजुराची पौष्टिक बर्फी तयार.