Healthy Lifestyle : त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी तुमची लाईफस्टाईल हवी हेल्दी..!

वय कितीही असो, त्वचा आणि केस निरोगी राहण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल असणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि व्यायामामुळे शरीर, त्वचा हेल्दी राहते.
Healthy Lifestyle
Healthy Lifestyleesakal

(लेखिका - स्वप्ना साने)

माझी मुलगी १७ वर्षांची आहे. तिला पिंपल्स खूप आहेत. पिंपल कमी-जास्त होतात, पण त्वचा पूर्णपणे क्लीन होत नाही. स्किन स्पेशालिस्टला दाखवून झाले. पण त्यांच्या उपायांनी तात्पुरते बरे वाटले. आणि काही दिवसांनी परत पिंपल येऊ लागले. काय उपाय करता येईल ?

: टीनएजमध्ये हार्मोनल बदल घडत असतात, त्यामुळे त्वचेवर पिंपल येणे हे कॉमन आहे. त्यात मुलांना अभ्यासाचा ताण असेल आणि खाण्यापिण्याच्या वेळा सारख्या बदलत असतील, तर पित्ताचा त्रास होतो आणि त्यामुळेसुद्धा त्वचेवर पिंपल येऊ शकतात. त्यात जर बाहेरचे खाणे होत असेल, जंक फूड अन् कोल्ड ड्रिंक घेत असतील तर त्यामुळे पोटाचे विकार होऊन त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो.

हल्ली मुलांचे बाहेर खाणे, चहा-कॉफीचे सेवन आणि जंक फूड खाणे याचे प्रमाण खूप वाढले आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जंक फूडच्या आहारी गेले आहेत. त्याचे परिणाम त्वचा आणि केसांवर दिसतातच. वेळीच काळजी नाही घेतली, तर स्थूलता, शुगर, बीपी हे सगळे त्रास कमी वयात सुरू होतात.

Healthy Lifestyle
Wedding Special : लग्नासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही; कमी बजेटमध्ये अशी करा आकर्षक स्टेज सजावट

ह्यावर उपाय म्हणजे हेल्दी लाइफस्टाइल आत्मसात करायला हवी. घरातील सगळ्यांनीच ठरवून जंक फूड टाळायला हवे. कोल्ड ड्रिंकऐवजी फळांचे रस प्यावेत. फळे खावीत. पिंपलसाठी उपाय सांगते. ॲलोव्हेरा जेलमध्ये ४ थेंब टी ट्री ऑइल घालून, नीट मिक्स करून रोज रात्री चेहऱ्याला लावावे. सकाळी पाण्याने स्वच्छ धुवावे. टी ट्री ऑइलयुक्त फेस वॉश वापरावा.

तसेच आठवड्यातून २ वेळा मुलतानी माती, चंदन पावडर आणि नीम पावडर अशा पावडरी सम प्रमाणात घेऊन गुलाब जलमध्ये मिक्स कराव्यात. हा पॅक २० मिनिटे लावून ठेवावा. नंतर साध्या पाण्याने धुऊन घ्यावे. बाहेर जाताना कॅलामाईन लोशन लावावे. वर म्हटल्याप्रमाणे, डाएट फॉलो करावे अन् पाणी भरपूर प्यावे. जेवणात व्हिटॅमिन सी भरपूर असणे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऑइली आणि जंक फूड पूर्णपणे बंद करावे. हे उपाय करून बघा, नक्की फायदा होईल.

मी झटपट वेट लॉसचा तीन महिन्याचा प्रोग्रॅम केला. व्यायाम न करता त्यांनी सांगितल्याप्रमाणे डाएट केले अन् त्यांनी दिलेले प्रोटिन शेकही घेतले. वजन थोडेफार कमी झाले, पण माझी त्वचा खूपच डल दिसायला लागली आहे आणि स्किनही लूज वाटतेय. माझे वय ३७ वर्षे आहे. झटपट वेट लॉसमुळे असे झाले असेल का? काय उपाय करता येईल ?

: व्यायाम न करता वजन कमी करणे, तेही कमी वेळात - अशा प्रोसेसमुळे शरीरावर, त्वचेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्यरित्या व्यवस्थित डाएट प्लॅन करून आणि काही व्यायाम किंवा योगासने करून वजन कमी करावे. असे केल्यास स्टॅमिनाही वाढतो.

शरीरात कुठल्याही पौष्टिक तत्त्वांची कमतरता राहत नाही. शिवाय वजन कमी होत असताना त्वचाही टोन होते. त्वचेची लवचिकता टिकून राहते आणि चेहराही तजेलदार दिसतो. योग्य आहार, व्यायाम करून वजन कमी व्हायला वेळ लागेल, पण शरीराचे कुठलेही नुकसान होणार नाही.

तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा न्यूट्रिशनिस्टकडून व्यवस्थित डाएट प्लॅन करून घ्या, असे मी सुचवेन. त्याचबरोबर व्यायाम किंवा योगासनांसाठी वेळ काढा. हल्ली घर बसल्या ऑनलाइन क्लासचीही सोय आहे. असे केल्याने त्वचा टोन होईल.

तुमच्या माहितीतल्या चांगल्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घेऊन बॉडी स्पाच्या काही सेटिंग करून घ्या. ह्यात मसाज केला जातो, त्यामुळे त्वचेला पोषण मिळून त्वचा टवटवीत होईल. तसेच नरीशिंग आणि टोनिंग फेशियलही करून घ्या.

चेहरा तजेलदार दिसेल आणि त्वचाही ग्लो करेल. काही गोष्टी इन्स्टंट करण्याच्या नादात आपण त्याचे होणारे दुष्परिणाम दुर्लक्षित करतो, हे चुकीचे आहे. कुठल्याही बाबतीत संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय त्या गोष्टी करू नयेत.

केसांमध्ये खूप कोंडा झाला आहे, हिवाळ्यात नेहमी होतो. उन्हाळा सुरू झाला की आपोआप नाहीसा होतो. पण आता ह्या वेळेस खूपच कोंडा जाणवतोय आणि तो केसांना चिकटून राहतोय. काय करावे ?

: हिवाळ्यात कोंडा होणे साहजिक आहे. हवामान कोरडे असल्यामुळे डोक्याची त्वचाही कोरडी पडते. तसेच थंडी असली की केसही नियमित धुतले जात नाहीत. अशा वेळी तैल ग्रंथीचे सिबम (म्हणजे नैसर्गिक तेल) आणि स्काल्पवरची मृत त्वचा असे एकत्र होऊन ते केसांना चिकटून राहते. ड्राय कोंडा लवकर क्लीन होतो, ऑइली कोंडा असल्यास मेडिकेटेड शाम्पू वापरू शकता. आठवड्यातून तीन वेळा मेडिकेटेड अँटिडँडरफ शाम्पूने केस धुवावेत.

घरगुती उपायही करता येतील. केसांना २० मिनिटे दही लावून ठेवावे. नंतर कोमट पाण्याने केस धुवावेत. तसेच, घरच्याघरी हेअर पॅक तयार करता येईल. त्यासाठी २ मोठे चमचे मुलतानी माती घेऊन त्यात १ चमचा मीठ, १ चमचा संत्रा पावडर, १ चमचा आवळा पावडर घालून, त्यात दही मिक्स करून पेस्ट तयार करावी. त्या पेस्टमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब टाकावेत आणि १ चमचा लिंबाचा रस घालावा.

हा हेअर पॅक केसांच्या मुळाशी आणि संपूर्ण डोक्याला लावावा. २५ ते ३० मिनिटांनी केस धुवावेत. महत्त्वाचे म्हणजे, हिवाळ्यात खूप जास्त गरम पाणी वापरू नये, कोमट पाणी वापरावे. अतिगरम पाणी वापरल्याने त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते. तुमचा केसांमधला कोंडा सीझनल आहे, त्यामुळे तुम्ही हे उपाय करून बघा. पण ज्यांना सारखा कोंडा होतो, त्यांनी मात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रमाणे त्यावर उपचार घ्यावेत.

Healthy Lifestyle
Skin Care Tips : चेहऱ्यावर चमक हवी आहे? मग, पालक आहे मदतीला, बनवा 'हे' होममेड फेसपॅक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com