Premium|Hair Fall and Dandruff Solutions : केस गळती आणि कोंड्याने त्रस्त आहात? महागड्या ट्रीटमेंटपेक्षा 'हे' नैसर्गिक उपाय ठरतील अधिक प्रभावी

Healthy Hair Habits : धावपळीची जीवनशैली, चुकीचा आहार आणि रसायनांचा अतिवापर यामुळे केसांच्या समस्यांचे प्रमाण वाढत असून, नैसर्गिक निगा आणि पौष्टिक आहाराच्या जोडीनेच केसांचे सौंदर्य टिकवणे शक्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Hair Fall and Dandruff Solutions

Hair Fall and Dandruff Solutions

esakal

Updated on

स्वप्ना साने

केसांना मुळापासून टोकांपर्यंत नीट पोषण मिळत नाही, केस डॅमज झालेले असतात. अशा वेळेस आधी एखादा चांगला हेअर कट करून घ्यावा आणि नंतर काही दिवस तज्ज्ञांच्या सल्ल्याने हेअर ट्रीटमेंट करून घ्यावी. पौष्टिक आहार घ्यावा. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सची गरज असेल, तर त्याप्रमाणे सल्ला घेऊन सुरू करावेत.

हेल्दी केस म्हणजे छान चमकदार, दाट, कोंडा नसलेले, स्प्लिट एन्ड्स नसलेले, न गळणारे केस. परंतु हल्ली असे केस बघायला मिळत नाही. लहान मुलांच्यादेखील केसांच्या समस्या वाढत आहेत. तसंच टीनएजपासून केस पांढरे होणे, गळणे, कोंडा, ड्रायनेस इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पांढऱ्या केसांमुळे कमी वयात हेअर कलरचा वापर केला जातो, स्ट्रॉँग केमिकल्स असलेली प्रॉडक्ट्स वापरली जातात. मध्यम वयात येईपर्यंत डोक्यावर जेमतेम केस राहतात. मग हेअर ट्रान्सप्लांट, हेअर एक्सटेन्शन यांसारख्या तात्पुरत्या उपायांनी हा केसांच्या प्रॉब्लेम्सचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.

तुमचे केस जसे आहेत तसेच नैसर्गिकरित्या मेंटेन करायला शिका. कुरळ्या केसांना मॉइस्चरायझिंग, हेअर स्पा केल्यास कर्ल्स छान हेल्दी आणि चमकदार दिसतील. तसेच स्ट्रेट केसांना हायड्रेटिंग हेअर पॅक वगैरे लावून आणि साजेसा हेअर कट देऊन मेंटेन करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com