

Cockroach Found In Dal Khichadi
ESakal
मुंबई : महिनाभरापूर्वी पुण्यातील नळ स्टॉप परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये नाश्त्याच्या पोह्यात झुरळ सापडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली हाती. इतकेच नव्हे तर ऑनलाईन ऑर्डर केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थातही अळ्या, किडे किंवा बुरशी लागलेली दिसून येते. अशा प्रकारामुळे अन्नसुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असताना मुंबईत अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे