भूषण महाजन
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंदीचे स्वागत करणे, बाजारातील चंचलता आपल्या फायद्यासाठी वापरणे व स्वतः अभ्यास करत राहणे. त्याला पर्याय नाही.
जम्मू-काश्मीरने मुंबईला रणजी स्पर्धेत धूळ चारावी आणि तेही रोहित शर्मा, अजिंक्य राहणे वगैरे दिग्गज संघात असताना... हे पचवायला कठीण जाते. तशीच वेळ शेअर बाजारात आली आहे. रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंद लिव्हरसारखे ब्लू चीप शेअर निफ्टीत असताना तेजीवाल्यांना सतत पराभवाचा सामना करावा लागतोय.
जानेवारीचा चौथा सप्ताह काही वेगळा नव्हता. सप्ताहाच्या सुरुवातीला २३२९० अंशावर असलेली निफ्टी २३०९० अंशावर बंद झाली. पुन्हा आम्ही मागचेच तुणतुणे वाजवतोय. निफ्टी २०० दिवसांच्या चल सरासरीच्या खाली आहे, आता यापुढील लक्ष्य २२८०० व त्याखाली गेल्यास पुन्हा तपासू. आता पुन्हा तेजीत येण्यास बरेच परिश्रम करावे लागणार! असो.