मैत्रेयी पंडित-दांडेकर
...मी काही तास त्या वीतभर खिडकीतून दिसतील तेवढे सगळे ढग पिंजून काढले. एक डॉलरसाठी (किंवा त्या इनमीन १० सेंटसाठी) एअर होस्टेस काकूंच्या चवदार(!) खाण्यावरपण मी पाणी सोडलं. घरी कधी न मिळणारा ऑरेंज ज्यूसपण सोडला. आणि इतकं सगळं करूनपण या टूथ फेरीचा बंगला शोधण्याचा माझा प्रयत्न साफ अयशस्वी ठरला.