Premium|Traditional Chirote Recipe : दिवाळीच्या फराळात बनवा खुसखुशीत चिरोटे

Traditional Diwali Faral Recipes : दिवाळीच्या फराळात चिरोट्यांना खास महत्त्व आहे, थर सुटणारे चिरोटे घरी बनवण्यासाठी जाणून घ्या पारंपरिक पाककृती आणि महत्त्वाच्या टिप्स.
Traditional Chirote Recipe

Traditional Chirote Recipe

esakal

Updated on: 

अदिती परांजपे

सण-उत्सव म्हटले की घराघरांतून दरवळणारा फराळाचा घमघमाट मनाला भुरळ घालतो. त्यातही जाळीदार अनारसे व जिभेवर ठेवताच विरघळणारे चिरोटे फराळाच्या ताटाला चार चाँद लावतात. अशा या अनारसे व चिरोट्यांचा खास बेत बघू या...

वाढप

२० ते २५ चिरोटे

साहित्य

पिठासाठी : दोन कप मैदा, ३ मोठे चमचे साजूक तूप (कडकडीत मोहनासाठी), चिमूटभर मीठ, कोमट पाणी, ३ ते ४ मोठे चमचे साजूक तूप (वितळलेले, पण थंड किंवा कोमट असावे), ३ ते ४ मोठे चमचे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ. पाकासाठी : दीड कप साखर, ३ ते ४ कप पाणी (साखर बुडेल इतके), अर्धा छोटा चमचा वेलची पूड, १० ते १२ केशराचे धागे (आवडीनुसार), तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती

एका परातीत मैदा घेऊन त्यात मीठ घालावे. मग यात कडकडीत साजूक तुपाचे मोहन घालावे आणि हाताने चांगले मळून घ्यावे, जेणेकरून मोहन मैद्याला समप्रमाणात लागेल. आता पिठात थोडे थोडे कोमट पाणी घालत पुरीच्या पिठापेक्षा थोडेसे घट्ट आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडे कडक पीठ मळून घ्यावे. मग २० मिनिटे बाजूला मुरण्यासाठी ठेवावे. साटा तयार करण्यासाठी एका छोट्या वाटीत तीन ते चार चमचे साजूक तूप वे तेवढेच चमचे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ घेऊन एकत्र फेटून घ्यावे. हे मिश्रण क्रीमसारखे एकजीव झाले, की चिरोट्यांना छान थर सुटतात. आता भिजवलेल्या पिठाचे समान आकाराचे गोळे करावेत. या गोळ्यांपैकी पाच गोळ्यांच्या समान आकाराच्या पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. पहिली पोळी पोळपाटावर ठेवावी व त्यावर तयार केलेला साटा चमच्याने सर्व बाजूंनी एकसारखा लावा. त्यावर दुसरी पोळी ठेवावी व पुन्हा साटा लावावा. अशाच प्रकारे पाचही पोळ्या एकावर एक रचून घेत प्रत्येक थरावर साटा लावावा.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Traditional Chirote Recipe
Premium|Global Interest Rate Hikes : जागतिक बाजारात पुन्हा ‘महाग पैशाचे पर्व’?
Loading content, please wait...