Premium|Lentil Based Desserts: डाळींच्या विविध गोड पदार्थांची खासियत: पिंक जामुन ते तुरीच्या डाळीची पुरणपोळी

Indian dal sweets: डाळींपासून बनवलेले पौष्टिक गोड पदार्थ आरोग्यपूर्ण आणि स्वादिष्ट असतात. पिंक जामुन, उडदाचे लाडू, मसुरीची खीर आणि पुरणपोळी यांसारखे पदार्थ पारंपरिक आणि सोपे आहेत.
Lentil Based Desserts

Lentil Based Desserts

sakal

Updated on

पिंक जामुन

वाढप

३ व्यक्तींसाठी

साहित्य

एक मोठी वाटी मूग डाळीचे पीठ, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी खवा, १ चमचा बीट रस, चिमूटभर सोडा, २ वाट्या साखर, वेलची पूड, तळण्यासाठी तूप.

कृती

मूग डाळीच्या पिठात दही, खवा, सोडा, बीट रस घालून नीट कालवून घ्यावे. साखरेत २ वाट्या पाणी, वेलची पूड घालून पाच ते सात मिनिटे उकळून एकतारी पाक करून घ्यावा. कढईत तूप घालून वरील मिश्रणाचे जामुन मंद आचेवर भज्याप्रमाणे तळून घ्यावेत. पाक थोडा कोमट असताना त्यात तळलेले जामुन घालावेत आणि पाकात मुरले की हे पिंक जामुन सर्व्ह करावेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com