Premium|Traditional Festive Sweets Recipes : घरीच बनवा चार स्वादिष्ट गोड पदार्थ; जाणून घ्या सोप्या रेसिपी

Traditional Indian Festive Sweets Recipes : सणासुदीच्या गोड मेजवानीसाठी केशर श्रीखंड, सफरचंद-केळे हलवा, मखाणा खीर आणि हळिवाची बर्फी हे स्वादिष्ट पर्याय आहेत. सोप्या कृती आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून घरच्या घरी तयार करा खास गोड पदार्थ.
Traditional Festive Sweets Recipes

Traditional Festive Sweets Recipes

esakal

Updated on: 

वर्षा साठे

केशर श्रीखंड

साहित्य

अडीचशे ग्रॅम तयार चक्का किंवा ३०० ग्रॅम दही, २०० ग्रॅम पिठीसाखर, सजावटीसाठी केशर, काजू, बदाम, पिस्ते यांचे बारीक काप.

कृती

एका मलमलच्या कापडात दही घट्ट बांधून तीन ते चार तास ठेवावे. त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेले की चक्का तयार होतो. तयार चक्का रवीच्या किंवा ब्लेंडरच्या साहाय्याने एकजीव करावा. त्यामध्ये पिठीसाखर घालून मिश्रण एकत्र करावे. चमचाभर दुधात केशर मिसळून ते मिश्रणात घालावे. वरून काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे घालून थंडगार केशर श्रीखंड सर्व्ह करावे.

सफरचंंद-केळे हलवा

साहित्य

शंभर ग्रॅम सफरचंद, १०० ग्रॅम केळे, १०० ग्रॅम गाजर,

१५ ग्रॅम तूप, २ चमचे मिल्क पावडर, ५० ग्रॅम साखर,

पाव चमचा वेलची पूड, सजावटीसाठी सुकामेवा.

कृती

सर्वप्रथम सफरचंद व गाजर किसून घ्यावे व केळीचे बारीक काप करावेत. कीस व काप तुपावर लालसर-गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावेत. मग त्यात साखर व मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करावे. वरून वेलची पूड व सुकामेवा घालून हलवा सर्व्ह करावा.

Traditional Festive Sweets Recipes
Premium|Delhi Political Protests : राजधानीवर विश्वासाचे संकट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com