Premium|Hat history in India and world : डोक्यावरची वस्त्रं की ओळखीची खूण? जगभरातील हॅट्स, पगड्या, फेटे आणि भारतीय परंपरेतील ‘टोपी’चा रंजक वारसा

Cap Fashion Style Statement : वेषभूषे पलीकडे जात लोकांच्या स्वभावाची आणि क्षेत्राची ओळख बनलेली टोपी; उन्हाळ्याच्या रखरखत्या वणव्यात लहान मुलांचे रक्षण करणारी आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या या टोपीचे बदलणारे रूप आणि महत्त्व मांडणारे सुंदर विश्लेषण.
Hat history in India and world

Hat history in India and world

esakal

Updated on

स्नेहल बाकरे

काळानुसार टोपी स्टाइल स्टेटमेंट होत चालली आहे. टोपीचं महत्त्व वेषभूषेपुरतंच मर्यादित राहिलेलं नसून, लोकांच्या स्वभावाचं, वृत्तीचं आणि परिस्थितीचं वर्णन करण्यासाठीही ती सहजपणे वापरली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाणारी टोपी त्या क्षेत्राची ओळख, जबाबदारी आणि परंपरा व्यक्त करते.

उन्हाळा सुरू झाला, की जागोजागी जशी उसाच्या रसाची गुऱ्हाळं, आइस्क्रीमची दुकानं दिसतात, तशीच विविध रंगांच्या व आकारांच्या टोप्यांची दुकानंही सजलेली दिसतात. सुट्टी आणि वैशाख वणवा यांचं अजबच गणित आहे. रखरखत्या उन्हात जिवाची काहिली होत असतानाही मुलांना खेळायचा भारीच सोस! मग अशावेळी ही टोपी मात्र आईला आपल्या मुलांच्याबाबतीत एखाद्या ढालीसारखीच भासते. खास करून उन्हाळ्यात सगळ्यांचाच टोपीबद्दलचा स्नेह जरा जास्तच वाढू लागतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com