Premium|Mahua Tree Uses : मोहाच्या रानातून आदिवासींचा जीवनसाठा; फुले, भाकर, दारू आणि देवस्थानापर्यंतचा महुआ वृक्षाचा प्रवास

Tribal Forest Produce : आदिवासी जीवनाचा कल्पवृक्ष असलेल्या मोह वृक्षाचे आरोग्यदायी फायदे, फुलांपासून बनणारे चविष्ट पदार्थ, तेल आणि पारंपरिक मद्यनिर्मितीसह या वृक्षाचे धार्मिक महत्त्व आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्याचे मोलाचे स्थान अधोरेखित करणारा विशेष वृत्तांत.
Mahua Tree Uses

Mahua Tree Uses

esakal

Updated on

डॉ. मंदार दातार

कोवळ्या मोहाच्या फुलांची भाजी करतात. ही फुले स्वच्छ धुवून, कुस्करून कणकेत भिजवून त्याच्या पानग्यादेखील केल्या जातात. गोळा केलेली फुले वाळवून कणगीत भरून वर्षभरासाठी त्यांची बेगमी केली जाते. पुढे गरज पडेल तेव्हा फुले दळून त्याची भाकरही खाल्ली जाते. कधी रोख पैशांची गरज पडली, तर ही वाळवून साठवलेली फुले बाजारात विकली जातात.

ज्या दिवशी मी प्रियेस माझ्या प्रथम पाहीन 

त्या दिवशी मी तुझ्याच नावे तिला पुकारीन 

कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोरांनी मोहाच्या झाडाबद्दल लिहिलेल्या ओळींचा हा अनुवाद. टागोरांच्या पश्‍चिम बंगाल आणि आसपासच्या उत्तर भारतात कल्पवृक्ष असलेला मोह किंवा महुआ अपार मिळतो. महाराष्ट्रातही उत्तर कोकणामधील जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्येही मोह वाढतो. या प्रदेशातील आदिवासींच्या अधिराज्यात या वनजनांनी हजारो वर्षे अतिशय प्रेमाने सांभाळलेला, पानांच्या गोलसर छावणीचा हा देखणा वृक्ष, शेतांच्या बांधांवर, गाव-वस्त्यांजवळ आणि नैसर्गिक अरण्यात आढळतो. त्याच्या फळाची साल भाजीसारखी खाल्ली जाते, तर त्याच्या टोळी नावाच्या बियांपासून खाद्यतेल तयार केले जाते. हे खाद्यतेल वनवासींच्या अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. पण मोह वृक्षाचा सर्वात उपयोगी भाग म्हणजे त्याची साखर भरलेली मांसल पाकळ्यांची फुले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com