

Marriage compatibility skills
esakal
लग्नसोहळा म्हणजे जोडीदाराच्या शोधापासून सुरू झालेला आणि सहजीवनाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला प्रवास... लग्न म्हटल्यावर डोळ्यांसमोर येते तयारीची लगबग, नातेवाईकांची धावपळ, फोटोसेशनच्या पोझेस, मेंदीतली नावं, हसण्याचे आणि खोड्या काढण्याचे आवाज, रुसव्या-फुगव्यांचे गोड क्षण,
सोबतीची हुरहुर आणि सहजीवनाची चाहूल!
या अंकात वाचा नवीन नातं, नवं कुटुंबं जोडलं जाताना मनोमनी उसळलेल्या भावनांपासून फॅशन ट्रेंड्सपर्यंत आणि जोडीदाराच्या निवडीसाठी दिलेल्या सल्ल्यांपासून तयारीसाठी मदत करणाऱ्या लेखापर्यंत बरंच काही...
सर्व लग्नाळूंना शुभेच्छा, नांदा सौख्यभरे!
एखाद्या मॅट्रिमोनियल साइट्सवर जुळणाऱ्या गोष्टी, उत्पन्न, जात एवढ्याच गोष्टींवर अनुरूपता ठरत नाही. अनुरूपता म्हणजे तुमच्यातल्या वेगळेपणासाठीचा सुरक्षित अवकाश. ती निर्माण करण्यासाठी एकमेकांशी मूल्यव्यवस्था जुळणं, उत्तम संवाद कौशल्य असणं आणि वादचर्चेचं कौशल्य अवगत करणं अतिशय महत्त्वाचं आहे.