
अमृता आपटे
उदयपूरमधलं व्हिंटेज कार कलेक्शन हा कारप्रेमींसाठी एक नजराणाच आहे. अगदी घोडागाडीपासून राजा-महाराजांच्या वापरासाठी परदेशातून मागवलेल्या, इंग्रजांनी भेट दिलेल्या गाड्या असलेलं हे प्रदर्शन बघण्यासारखं आहे.
अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेलं उदयपूर मानवनिर्मित तलावांसाठी ओळखलं जातं. तलावांशिवाय ऐतिहासिक किल्ले, राजवाडे, संग्रहालयं, कलादालनं, बागा, वास्तुकला, पारंपरिक सण, उत्सव आणि जत्रा या सगळ्यांमुळे देशविदेशातून पर्यटक उदयपूरकडे आकर्षित होतात.