योगेश ठाणगे
तुम्हाला तंत्रज्ञानाची आवड असेल, नव्या गोष्टी शिकण्याची ऊर्मी असेल आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर करिअर घडवायचे असेल, तर सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन्हीची सांगड घालणारे क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम आहे. या क्षेत्रात यायचे ठरवलेत, तर उद्याचे डिजिटल जग तुमच्यावरच अवलंबून असेल!
डिजिटल युगाच्या विस्तारासोबतच सायबर सुरक्षेचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. दररोज वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा वापर करून डेटा थेफ्ट, डेटा हॅकिंग, फिशिंग अशा सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सायबर सुरक्षा क्षेत्राला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. आता तर सायबर सुरक्षा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगत तंत्रज्ञानाचाही समावेश झाला आहे. त्यामुळे हे क्षेत्र अधिकच गतिमान आणि आकर्षक होत आहे. परिणामी या क्षेत्रातील करिअर संधीही वाढत आहेत.