
विश्वास भावे
आपल्यातल्या प्रत्येकालाच सुंदर, निसर्गरम्य भागांत भटकंती करायची हौस असते. त्यासाठीच तर आपण हिल स्टेशन्स, समुद्रकिनारे अशा ठिकाणी सहलींना जातो. निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याच्या इच्छेतून तरुण मुलांमध्ये ट्रेकिंगची आवड वाढायला लागली, त्यातून निसर्गाच्या विविध घटकांचा अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली. आता तर अभ्यासू वृत्तीने जंगलात फिरण्याकडेही कल वाढू लागला आहे. विविध जंगलांना भेटी देणाऱ्यांची संख्याही हल्ली खूप वाढते आहे.