Premium|Counselor Self-Care Techniques : काउन्सिलरही माणूसच असतो! दुसऱ्यांच्या वेदना ऐकताना थेरपिस्टच्या मनावर काय परिणाम होतो?

Transference and Counter-transference : मानसिक आरोग्य व्यावसायिकांनी स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपणे प्रभावी उपचारांसाठी अनिवार्य असून, ट्रान्सफरन्स आणि काउंटर-ट्रान्सफरन्स सारख्या प्रक्रिया समजून घेऊन 'सेल्फ-केअर' आणि ब्रेक घेतल्यास थेरपिस्टचा भावनिक ताण कमी होऊन कार्यक्षमता वाढते.
Counselor Self-Care Techniques

Counselor Self-Care Techniques

esakal

Updated on

डॉ. अनुजा कुलकर्णी

मानसिक आरोग्य व्यावसायिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे अत्यंत गरजेचे आहे. जे लोक अडचणीमध्ये असतात, त्यांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचे काम काउन्सिलर करतात. पण जर काउन्सिलरच स्वतःच्या आयुष्यातील अडचणींमुळे खचलेले असतील, तर हे कार्य प्रभावीपणे करणे शक्य होत नाही. क्लायंटला काउन्सिलरची भीती नाही, तर दिलासा वाटला पाहिजे.

आपल्या समाजात काउन्सिलर किंवा थेरपिस्ट यांच्याबद्दल एक ठरावीक प्रतिमा असते - ते नेहमीच शांत असतात, कधीही थकत नाहीत, त्यांना कधीही राग येत नाही, ते सदैव हसतमुख असतात वगैरे. पण हे वास्तव नाही. काउन्सिलरही माणूस असतो. त्याच्या आयुष्यातही संसार असतो, मुलेबाळे असतात, आई-वडील असतात, दवाखान्याच्या फेऱ्या असतात आणि स्वतःचे दुःखही असते. या सगळ्या गोष्टींबरोबरच ते रोज इतरांच्या वेदना ऐकतात, त्यांच्या मनातल्या खोल जखमांना सामोरे जातात. या प्रक्रियेत त्यांच्या स्वतःच्या मनावरही परिणाम होतो. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची नियमित काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेणे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com