Premium|US Stock Market Crash : अमेरिकन बाजारातील घसरणीमागील कारणे आणि भारतावरील परिणाम

Global Market Volatility : अमेरिकन शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमागे व्याजदर कपातीबाबतची अनिश्चितता, गुंतवणूकदारांची चिंता आणि अपेक्षेपेक्षा जास्त सावध बाजारभावना कारणीभूत ठरली असून त्याचा परिणाम जागतिक बाजारांवर दिसत आहे.
US Stock Market Crash

US Stock Market Crash

esakal

Updated on

आपले निर्देशांक किती खाली जातील याला मर्यादा आहेत. आपल्या देशाच्या दृष्टीने तात्पुरते का होईना खनिज तेल स्वस्त झाले आहे, रुपया वधारला आहे, ट्रम्प तात्यांनी इस्राईलला दम भरला आहे, तेव्हा आपण पेला अर्धा भरलेला बघावा, अर्धा रिकामा आहे हे बघू नये.

अमेरिका व जगातले सर्वच शेअर बाजार गेले वर्षभर तेजीत होते पण त्यात भारताला वगळले होते, त्याची खदखद मनात होतीच. म्हणूनच ता. ५ जूनला अमेरिकेत शेअर बाजारात पानिपत झाले, त्याचा भारतीय पंटर्सला क्षणिक आनंदच झाला. ता. ८ जूनला आपल्या बाजारात काय होणार याची भीती आणि चिंता त्यानंतर जागी झाली. डाऊ जोन्स ६९५, एसएनपी ५०० व २०० अंश आणि नॅस्डॅक ११२८ अंशांनी खाली आले. त्यातून अमेरिकी शेअर बाजाराचे मूल्य अडीच लाख कोटी डॉलरने खाली आले. याची अनेक कारणे असू शकतात.

रोजगारनिर्मिती वाढली व त्यामुळे पुढे होणाऱ्या ‘फेड’च्या बैठकीत कदाचित व्याजदर कमी होणार नाही, या चिंतेने बाजाराला घेरले. हे म्हणजे रोगी बरा होतोय की काय असे वाटतेय हे बघून भेटायला न आलेल्या नातेवाइकांना चिंता वाटावी तसे झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com