Premium|Smrutipakhare Book : सोनेरी आठवणीची स्मृतिपाखरे...

Smrutipakhare : A Literary Flight into Cherished Childhood Memories. : 'स्मृतिपाखरे' हे पुस्तक म्हणजे जुन्या-नव्या पिढ्यांना जोडणारा दुवा आहे; यातून संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि संस्काराचा वारसा पुढे नेला आहे.
Smrutipakhare Book

Smrutipakhare Book

esakal

Updated on

आईचा ८०वा वाढदिवस साजरा करत असताना हे पुस्तक प्रकाशित केले आहे, कारण या लेखातील सर्वच स्मृती म्हणजे आम्हा भावंडांना आई-वडिलांनी दिलेले सुवर्णक्षण आहेत असे लेखिकेला वाटते. ‘आमचं तळघर’, ‘आमचा वाडा’ व ‘धाब्यावरच्या गमतीजमती’ या लेखांसाठी रेखाचित्र रेखाटताना माझ्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू गवसला असे लेखिका सांगतात, तेव्हा कलेतूनच एक कला जोडली जात असते आणि आपल्या कलेतूनच आपल्याला आनंदाच्या वाटा सापडायला लागतात असे वाटते.

वंदना लोखंडे यांनी लिहिलेले स्मृतिपाखरे हे ललित लेखांचे पुस्तक वंदन पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे आमच्या अगोदरच्या पिढीप्रति कृतज्ञता, आमच्या पिढीसाठी आठवणींचा उजाळा व पुढच्या पिढीसाठी माहितीचे भांडार अशी ही त्रिवेणी आहे असे लेखिकेला वाटते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यात अगोदरच्या पिढीच्या संस्कारक्षम व संवेदनशील मनातून उमटलेल्या भावनांचे दर्शन व त्यातून मिळणारी अनुभूती वाचकाला निश्चितच सुखावह ठरेल, अशी लेखिका वंदना लोखंडे यांची भावना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com