

Village to City Journey
esakal
अक्षय प्रभाकर वाटवे
मनानं तुम्ही गावाशी जोडलेलं राहता आणि शरीराला मात्र शहरात पळवत असता. मनाला गावाच्या झाडाखाली बसून मिळणारं सावलीचं सुख हवं असतं, शरीर मात्र सिमेंटच्या जंगलात तापत राहतं... मग करायचं काय अशा वेळी? ही मन आणि शहरातली दरी लवकरात लवकर कमी करण्यासाठी प्रयत्न करायचे. आज सर्वत्र ‘राष्ट्र प्रथम’चा बोलबाला आहेच की! विश्वची माझे घर, ‘वसुधैव कुटुंबकम्’ही आहेच.
प्रसंग पहिला : ओट्यावर वाढून ठेवलेल्या ताटावर झाकलेलं ताट काढून मी माझं जेवण माझ्या पीजीच्या खोलीत घेऊन गेलो. थंडगार डाळभाताचे पहिले दोन घास कसेबसे पोटात गेले. तिसऱ्या घासाबरोबर माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं...
प्रसंग दुसरा : माझ्या बायकोनं छान बेत केला होता; पुलाव, मिक्स व्हेज आणि मग आइस्क्रीम वगैरे... आणि आमच्या मित्रमंडळींबरोबर आम्ही ती संध्याकाळ एन्जॉय करत होतो.
आणखी दोन प्रसंग
पहिला : मुंबईतल्या एका प्रसिद्ध नाट्यगृहात एक नृत्याचा आणि गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. अगदी शेवटच्या रांगेत बसून मी त्या कार्यक्रमाचे निवेदक काय बोलतात, कसं बोलतात ते बारीक लक्ष देऊन ऐकत होतो.
दुसरा : पुण्यातल्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिरात हाऊसफुल्ल प्रेक्षकांसमोर माझी संकल्पना असलेल्या आणि आमच्या टीमनं दिवस-रात्र मेहनत करून साकारलेल्या एका दिमाखदार सांगितिक कार्यक्रमाचा प्रयोग आम्ही सादर करत होतो आणि त्यातल्या माझ्या निवेदनातल्या एका वाक्याला प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला...
***