

Traditional Diwali Ladoo Recipes
esakal
सुप्रिया खासनीस
दिवाळी म्हटलं, की फराळाच्या ताटात मानाचा लाडू हवाच. लाडूशिवाय फराळ अपूर्णच. या लाडवानं लग्नातली रुखवतं, मुंजीतली रुखवतं, सण-समारंभ यांमध्ये मानाचं अढळ स्थान राखलेलं आहे. फराळाच्या ताटात काजू बेदाणे लावलेला ‘स्मायली’ लाडू दिसला म्हणजे ताट पूर्ण झालं! अशा या लाडवाच्या काही पारंपरिक व इतर पाककृती...
वाढप
१५-२० लाडू
साहित्य
दोन वाट्या खवा, १० चांगल्या प्रतीचे अक्रोड, ८-१० चमचे पिठीसाखर.
कृती
अक्रोडातील मगज जाडसर कुटून घ्यावे. बारीक पूड करू नये. नंतर कढईत तूप न घालता भरड परतून घ्यावी. मग खवा मोकळा करून भाजलेल्या अक्रोडात घालून पुन्हा थोडे परतून घ्यावा. तयार झालेल्या मिश्रणात पिठीसाखर घालावी व परतावे. मिश्रण घट्ट झाले की उतरून घ्यावे. साधारण कोमट झाले की त्याचे लाडू वळावेत.
वाढप
१५-२० लाडू
साहित्य
एक मोठा नारळ, २ वाट्या साखर, वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे, बेदाणे, ३ चमचे घट्ट साय.
कृती
प्रथम खोवलेल्या नारळामध्ये साखर व साय घालून मिश्रण पातेल्यात एकसारखे करावे. पाच मिनिटे तसेच ठेवावे. नंतर मंद गॅसवर पातेले ठेवून मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण चांगले शिजू द्यावे. नंतर खाली उतरवून घ्यावे. त्यात वेलची पूड, ड्रायफ्रुट्सचे तुकडे, बेदाणे घालावेत. मिश्रण कोमट असताना लाडू वळावेत.