Premium|Summer Travel Tips : उन्हाळ्यातला ‘कूल’ प्रवास; 'योग्य कपडे, पाणी, सनस्क्रीन आणि प्रथमोपचार कीटसह सुरक्षित सफरीचे सोपे नियम

Sun Protection Guide : वाढत्या तापमानात उन्हाळी प्रवास सुखद करण्यासाठी योग्य कपड्यांची निवड, पाण्याचे प्रमाण, त्वचा व डोळ्यांची निगा आणि प्रवासाच्या वेळांचे अचूक नियोजन करून उष्माघातासारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करणे आता अत्यंत सोपे आणि आवश्यक झाले आहे.
Summer Travel Tips

Summer Travel Tips

esakal

Updated on

श्रेया माधवी

उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेतली, तर प्रवास झेपतो. ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या म्हणीनुसार प्रवासामुळे आजारी पडण्याआधीच स्वतःची आणि सहप्रवाशांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. प्रखर झळांमध्येही योग्य काळजी घेतली व सजगता बाळगली, तर उन्हाळ्यातला प्रवासही अविस्मरणीय, सुखद आणि आरामदायी होईल यात शंका नाही.

हल्ली कोणताही ऋतू असो, या ना त्या कारणानं प्रवास होतोच. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये प्रवास जरा सुसह्य असतो, कारण वातावरण थंड असतं. त्यामानानं उन्हाळ्यात मात्र उन्हाच्या काहिलीमुळे प्रवास अगदीच नकोसा वाटतो. त्यात तापमानवाढीमुळे उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यात प्रवास टाळण्याकडे कल असतो. पण दरवेळी प्रवास टाळणं शक्य होत नाही. उन्हाळ्यात प्रवास करताना नेहमीपेक्षा जास्त काळजी घेणं जरुरीचं ठरतं. प्रवासादरम्यान काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या, तर कडक उन्हातही प्रवास सुरक्षित होऊ शकतो.

प्रथमोपचार

उन्हाळ्यात प्रवासामुळे अतिथकवा जाणवू शकतो किंवा उष्माघात, ऊन लागणं असे उन्हाळी त्रास होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी प्रथमोपचाराचं एखादं कीट जवळ बाळगावं. ॲँटिबायोटिक्स, अँटिसेप्टिक वाइप्स, पेन-रीलिफ स्प्रे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओआरएसची पाकिटं या वस्तू उन्हाळ्यात प्रवास करताना सोबत असाव्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com