Premium|Weekly Insulin Injection : मधुमेह उपचारात मोठी झेप; आठवड्यातून एकदाच इन्सुलिनची नवी आशा

Weekly Insulin Injection : आठवड्यातून एकदाच इन्सुलिन घेण्याच्या नव्या उपचारपद्धतीमुळे मधुमेही रुग्णांना दररोजच्या इंजेक्शनमधून दिलासा मिळू शकतो. उपचारातील सातत्य, साखरेवरील नियंत्रण आणि जीवनमान सुधारण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.
Weekly Insulin Injection

Weekly Insulin Injection

esakal

Updated on

मधुमेह आजच्या काळातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक ठरला आहे. एकेकाळी प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळणारा हा आजार आता तरुणांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत पोहोचला आहे. बदलती जीवनशैली, वाढते स्थूलत्व, ताणतणाव, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहार यांमुळे मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विशेषतः ज्यांना इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागते, त्यांच्यासाठी दररोज इंजेक्शन घेणे हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा ताण असतो. अशा वेळी आठवड्यातून केवळ एकदाच इन्सुलिन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या नव्या संशोधनाने मधुमेह उपचारात नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नुकतेच ‘नोव्हो नॉर्डिस्क इंडिया’ या कंपनीने ‘अविकली’ हे आठवड्यातून एकदाच घेण्याजोगे इन्सुलिन तयार केले आहे. हे इन्सुलिन ‘टाइप १’ व ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी उपलब्ध असेल. त्याचबरोबर याआधीच्या संशोधनात इन्सुलिन आयकोडेक आणि इन्सुलिन एफसिटोरा अल्फा या आठवड्यातून एकदा दिल्या जाणाऱ्या दीर्घकालीन इन्सुलिनच्या प्रकारांनी आशादायक परिणाम दाखवले आहेत. विविध आंतरराष्ट्रीय क्लिनिकल चाचण्यांमध्ये या औषधांनी रक्तातील साखरेवर दररोजच्या बेसल इन्सुलिनइतकेच प्रभावी नियंत्रण मिळवून दिल्याचे दिसून आले आहे. काही देशांमध्ये इन्सुलिन आयकोडेकला नियामक मान्यता मिळाली असून, इतर देशांतही मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘अविकली’चे यशही आशादायक ठरते. इन्सुलिन एफसिटोरा अल्फा अद्याप अंतिम टप्प्यातील अभ्यासांत आहे; परंतु त्याचेही निष्कर्ष उत्साहवर्धक मानले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com