मृणाल तुळपुळे
आपल्याकडे प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या फळांची, फ्लेव्हर्सची आइस्क्रीम्स मोठ्या आवडीने खाल्ली जातात. व्हिगन आइस्क्रीमच्या बेसिक मिश्रणात आंबा, सीताफळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी अशा फळांचा गर अथवा बारीक तुकडे घालून उत्तम चवीचे आइस्क्रीम करता येते.
बदामाच्या दुधात केशर व पिस्त्याची पूड घालून केलेले केशर-पिस्ता आइस्क्रीम अथवा ड्रायफ्रुट्सची भरड पूड घालून केलेले ड्रायफ्रुट आइस्क्रीम वा आंब्याच्या हंगामात आंबा आइस्क्रीम हे व्हिगन आइस्क्रीमचे काही मस्त प्रकार आहेत. तांदळाचे दूध व आंबा, स्ट्रॉबेरी, चिकु अशा फळांचा पल्प वापरून केलेले व्हिगन आइस्क्रीम अतिशय चविष्ट लागते.