डॉ. श्रीकांत कार्लेकर
रामसेतूच्या निर्मितीबद्दल आणि त्याच्या नेमक्या रचनेबद्दल अनेक मतमतांतरे आणि वाद आहेत. हा सेतू म्हणजे पृष्ठभागावर कठीण आणि खाली भरड व मृदू असलेल्या वालुकाश्म आणि गुंडाश्म खडकांच्या एकमेकांना समांतर असलेल्या उंचवट्यासारख्या रांगा आहेत.
सीतेला सोडवण्यासाठी प्रभू रामांनी सेतू बांधून समुद्र पार केला, ही रामायणातली कथा सर्वज्ञात आहे. हा सेतू रामसेतू म्हणून ओळखला जातो. लंका जिंकून परत येत असताना प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाच्या सांगण्यावरून आपल्या धनुष्याच्या टोकाने स्वतःच बांधलेला सेतू तोडून टाकला, असे सांगितले जाते.
या रामसेतूचे एक टोक भारतातील धनुषकोडी येथे, तर दुसरे टोक महासागरात फक्त तीस किलोमीटर अंतरावर श्रीलंकेच्या किनाऱ्यावरील तालीमन्नार येथे आहे. रामेश्वरम द्वीपाच्या किनाऱ्यावर वसलेल्या या ठिकाणाला भारताचे दक्षिण टोक मानले जाते. आज हे स्थान भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या अगदी मध्यात असलेले पाहायला मिळते.