हर्षदा वेदपाठक
अंडरवर्ल्डकडून घरावर झालेला हल्ला आणि जिथे कुठे असेल तेथे प्राणघातक हल्ला करण्याची मिळालेली धमकी अशा घटनांनंतर अभिनेता सलमान खान खूपच सावध झाला. सुलतान या चित्रपटाच्या मुलाखतीदरम्यान त्याने दिलेल्या स्टेटमेंटचा विपर्यास झाल्याने, सलमान खानने मीडियाबरोबर अबोला धरला होता.
मात्र सिकंदर या चित्रपटाच्या निमित्ताने हा अबोला सुटला. त्यानंतर झालेल्या भेटीत सलमानने जिवाची भीती, त्याचे करोडो रुपये कोण सांभाळते, हॉलिवूड, हल्ली चित्रपट का चालत नाहीत यांसह वडिलांबद्दल असलेला आदर याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.