lack of discipline in driving Esakal
साप्ताहिक
शहराशहरांमधल्या घसरत्या वाहतूक शहाणिवेचे सारे पाईक असंस्कृत आणि अशिक्षित
कोणत्याही शहरातली वाहतूक उदाहरणादाखल घेतली तर त्यातून उमटत राहील अनाठायी घाई, अकारण गाठला जाणारा वेग, बेपर्वाई, कायदा आणि तो पाळणाऱ्यांबद्दलचा अनादर असे बरेच काही..
संपादकीय
‘मला सांगा तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवर कोणती गाणी आहेत; मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’, असे कोण्या फ्रेंच की जर्मन महाकवीने म्हणून ठेवले आहे म्हणे.
एखाद्या परिस्थितीत माणसं कशी वागतात त्यावरून त्या माणसांची किंवा ती माणसं ज्या समूहाचा भाग असतात त्या समूहाच्या सामूहिक शहाणिवेची पारख करण्यापुरता हा मुद्दा लक्षात घेतला, तर सध्याच्या काळात त्या महाकवीच्या या उद्गारांची एक आवृत्ती, ‘मला तुमच्या शहरातली वाहतूक दाखवा, मी तुम्हाला तुमची सांस्कृतिक उंची सांगेन’ अशीही असू शकते.