Premium|Funny shopping experiences : खरेदीचे अतरंगी किस्से

Shopping Fun : शॉपिंगमधील मजेशीर किस्से, फजिती आणि खरेदी करताना येणाऱ्या विविध गमतीदार अनुभवांचा खास खजिना.
Funny shopping experiences

Funny shopping experiences

esakal

Updated on

शॉपिंग हा सगळ्यांचाच अत्यंत लाडका विषय आणि विरंगुळाही... मग ती विंडो शॉपिंग असो, अथवा मॉलमधली, किंवा स्ट्रीट शॉपिंग असो! वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वस्तूंची, वेगवेगळ्या वेळी खरेदी करताना बरेच मजेशीर किस्से घडतात. कोणी फक्त सोबत जाऊनही ढीगभर शॉपिंग करून येतात, तर कोणी खरंच शॉपिंग करायचं असूनही काहीही खरेदी न करता परत येतात. कोणाला हवं तसं दुकान किंवा हव्या तशा वस्तू मिळत नाहीत, तर कोणाला सेल्समनच बोअरिंग भेटतो. कोणी अगदीच भांडून घासाघीस करतात, तर अनेकजण विकणारा सांगेल ती किंमत देऊन येतात... हीच तर गंमत असते खरेदीची! हे असेच काही गमतीदार किस्से...

एकटंच शॉपिंगला जायचं...

मला शॉपिंग करायला खूप आवडतं. हा किस्सा आठवला की मलाच हसू येतं. सुट्टीचा दिवस होता आणि माझ्या रूममेटनं माझी चॉइस चांगली असल्यामुळे मला शॉपिंगला नेलं. दुकानात त्याची कपडे खरेदी सुरू असताना मला मात्र खूपच अस्वस्थ वाटू लागलं. कारण हा माझ्यासमोर मनसोक्त खरेदी करत होता, आणि छान कपडे समोर असतानाही मी काहीही घेत नव्हतो. न राहवून मग मीही स्वतःसाठी कपडे बघायला सुरुवात केली. माझ्याही नकळत मी बरेच कपडे घेतले. बिल करण्यासाठी आम्ही काउंटरला गेलो. त्याचं बिल झालं फक्त साडेतीन हजार रुपये आणि माझं बिल झालं होतं तब्बल नऊ हजार रुपये! तिथून निघाल्यावर मी नऊ हजार रुपये वाया गेल्यामुळे माझ्या मित्रावरच ओरडू लागलो. तो चिडला आणि मला म्हणाला, ‘‘मी नव्हतं सांगितलं तुला खरेदी करायला, तुलाच अस्वस्थ वाटू लागलं म्हणून तूच खरेदी केलीस.’’ तेव्हापासून मी एकटाच शॉपिंगला जातो!

- प्रशांत जाधव

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com