
प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
स्त्रियांच्या विरोधातली हिंसा थांबविण्यासाठी स्त्रीवादी चळवळीने सुचवलेल्या विविध उपाययोजनांमध्ये समाजात (विशेषतः पुरुषांमध्ये) जाणीव-जागृती करणे, संवेदनशीलता निर्माण करणे, शासकीय यंत्रणेचं सहकार्य, कायद्याची मदत व समुपदेशनाचा समावेश होतो. स्त्रीवादी चळवळीत हिंसाग्रस्त स्त्रियांसमवेतचं काम अत्यंत महत्त्वाचं असतं. याचबरोबर लोकशिक्षण, धोरण आखणी, प्रचार आणि हिंसेच्या विरोधातल्या सामुदायिक कृतीसाठीही अनेक संस्था, संघटना मोलाची भूमिका बजावतात. पीडितांना कायदेविषयक मार्गदर्शन, समुपदेशन करतात. हिंसात्मक परिस्थितीत राहणाऱ्या स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना योग्य तो निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे, हा स्त्रीवादी समुपदेशनाचा मुख्य हेतू होय.