Women Fashion : उंची कमी आहे? मग कपडे खरेदी करताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

आपली शरीरयष्टी, उंची लक्षात घेऊन जर स्वतःचे कपडे व इतर ॲक्सेसरी प्लॅन केल्या, तरच तुम्ही इतरांपेक्षा युनिक दिसाल.
Women Fashion : उंची कमी आहे? मग कपडे खरेदी करताना 'या' टिप्स ठेवा लक्षात

सोनिया उपासनी-

आपली शरीरयष्टी, उंची लक्षात घेऊन जर स्वतःचे कपडे व इतर ॲक्सेसरी प्लॅन केल्या, तरच तुम्ही इतरांपेक्षा युनिक दिसाल.

फॅशन म्हणजे फक्त कपडे अथवा त्यावर वापरल्या जाणाऱ्या ॲक्सेसरी नव्हेत. आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेले कपडे घालून मिरवले, तर अधिक आकर्षक व फॅशनेबल दिसू, असा बहुतांश लोकांचा गैरसमज असतो. पण फॅशन ट्रेंड सतत बदलत असतात. बाजारपेठेत रोजच कुठलीतरी नवीन फॅशनसंबंधित वस्तू लाँच होते व थोड्या काळासाठी त्याचा ट्रेंड असतो.

अनेकजण अशा फॅशन काहीही विचार न करता फॉलो करतात. पण ही गोष्ट आपल्या अंगकाठीला शोभून दिसेल का, याचाही विचार करायला हवा हे विसरून जातात. दुकानांमध्ये उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच शोभून व उठून दिसेल असे नाही. आपली शरीरयष्टी, उंची लक्षात घेऊन जर प्रत्येकाने स्वतःचे कपडे व इतर ॲक्सेसरी प्लॅन केल्या, तरच तुम्ही इतरांपेक्षा युनिक दिसाल.

आता उंचीबाबत बोलायचे झाले, तर सर्वसामान्य उंची असणाऱ्या लोकांना कपडे निवडताना फार विचार करावा लागत नाही. पण उंची कमी किंवा जास्त असलेल्या लोकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर त्यांना योग्य कपडे निवडता येतील आणि स्वतःचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवता येईल. उंची जास्त असलेल्यांना तुलनेने कपडे निवडण्यामध्ये फार अडचण येत नाही. पण उंची कमी असणाऱ्यांना कोणत्या स्टाइलचे कपडे निवडावेत याबाबत संभ्रम असतो.

आवडीचे कपडे मिळाले नाहीत, तर मनात उगाचच शंकाकुशंका घर करू लागतात. हा ड्रेस मला शोभून दिसतोय का? मी ह्या कपड्यांमध्ये लहान तर दिसत नाहीये ना? ह्या पॅटर्नच्या ड्रेसमध्ये माझे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते आहे ना? असे अनेक प्रश्न मनात घोळू लागतात. मग अशावेळी फॅशनच्या बाबतीत काही चुका करणे टाळले, तर कमी उंची असली तरी फॅशनेबल राहून प्रत्येक ठिकाणी छाप टाकता येईल. त्यासाठी काही टिप-

Women Fashion : उंची कमी आहे? मग कपडे खरेदी करताना 'या' टिप्स ठेवा लक्षात
Women Fashion : परफेक्ट फॉर्मल लुकसाठी हे शर्ट स्टाइल करा, दिसाल सुंदर

मल्टिलेअर नकोत : अनेक लेअर्स, ज्याला आपण फ्रिलही म्हणतो अशा अनेक फ्रिल, असलेले कपडे परिधान करू नयेत. त्यामध्ये उंची आणखी कमी असल्याचा भास निर्माण होतो. जर फ्रिल आणि फ्लेअर्ड ड्रेस अधिक आवडत असतील तर मोनोक्रॉम शॉर्ट नी-लेंथ ड्रेस विथ शोल्डर फ्रिल ट्राय करू शकता. ह्यामध्ये लेअरचा फोकस जर लोअर बॉडीऐवजी अप्पर बॉडीवर असला तर उंची थोडी जास्त भासवता येते.

टॉपची योग्य निवड : टॉप निवडताना टॉपची उंची कमी असेल, असेच टॉप निवडावेत. म्हणजे लोअर बॉडी हाईट आपोआपच अधिक दिसते व एक छान इल्युजनरी लुक देता येतो. हायनेक टॉप वापरल्यास, अप्पर बॉडी उंच दिसते.

ओव्हरसाईज कपडे टाळावेत : आजकाल टीनएजर व कॉलेज स्टुडंटमध्ये ओव्हरसाईज कपडे वापरण्याचे खूप फॅड आहे. त्याचे कारण असे की अघळपघळ लूज ओव्हरसाईज टॉपमध्ये अत्यंत आरामदायी वाटते. पण उंची कमी असेल, तर अशा प्रकारचे ओव्हरसाईज आणि लूज कपडे घालण्याचे टाळावे. कारण असे सैलसर कपडे परिधान केल्याने तुमचे शरीर पूर्णतः झाकले जाते, अप्पर व लोअर बॉडी वेगळी दिसत नाही. परिणामी शरीराची उंची आपोआपच कमी दिसायला लागते. ह्यावर उपाय म्हणजे नीट अंगाबरोबर बसणारे कपडे वापरावेत.

लाँग ड्रेस : उंची कमी असताना जर लाँग अँकल लेंथ ड्रेस वापरला तर उंची आणखी कमी दिसते. त्यातही अशा लाँग ड्रेसला बॉर्डर असतील तर अजिबातच परिधान करू नये. त्याऐवजी शॉर्ट ड्रेस छान दिसतात. शॉर्ट ड्रेसवर बारीक बॉर्डर असेल तर छान एलिगंट लुक येतो.

मोठे प्रिंट : ज्या कपड्यांवर मोठे व ठळक प्रिंट असतात ते कपडे वापरायचे टाळावे. त्याऐवजी बारीक प्रिंट अथवा मध्यम आकाराचे प्रिंट असलेले कपडे वापरावेत, त्यामुळे उंचीही जास्त भासवता येते.

बोल्ड व ब्रॉड बॉर्डर : हा मुद्दा विशेषतः साड्या अथवा लाँग कुर्ते परिधान करताना लक्षात ठेवायचा आहे. ब्रॉड बॉर्डर असलेल्या साड्या वापरल्या तर ती बॉर्डर उंची झाकते. त्यामुळे साड्या विकत घेताना बॉर्डर बारीक असेल ह्याची काळजी घ्यावी आणि साडीवरचे बुट्टेसुद्धा बारीक असावेत.

फुटवेअर : बॉक्स हिल अथवा वेजेस हिल फुटवेअर वापरायला आरामदायी असतात, पण हे फुटवेअर जर बोल्ड कलरमध्ये वापरले तर उंची अजून कमी दिसते. त्यामुळे हिल्स वापरायच्या असतील, तर कमी उंचीच्या पेन्सिल हिल्स वापराव्यात अथवा वेजेसमध्ये न्यूड कलर वापरावा.

ॲक्सेसरीज : कुठल्याही प्रकारच्या बोल्ड ॲक्सेसरी वापरणे टाळावे. मोठ्या बॅगा, बोल्ड ज्वेलरी वापरल्याने फोकस तुमच्यावरून ॲक्सेसरींवर शिफ्ट होतो. मध्यम आकाराच्या अथवा छोट्या पर्स/ हँडबॅग वापराव्यात. नाजूक ज्वेलरी वापरावी.

ह्या सगळ्या बारीकसारीक बाबी जर लक्षात ठेवल्या, तर कुठल्याही ठिकाणी गेलात तरी तिथे तुमची छाप पडेल.आपली शरीरयष्टी, उंची लक्षात घेऊन जर स्वतःचे कपडे व इतर ॲक्सेसरी प्लॅन केल्या, तरच तुम्ही इतरांपेक्षा युनिक दिसाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com