Premium|Spartan Perfume Success Story : सुगंधी ‘यशो’गाथा; 'स्पार्टन' परफ्युमच्या यशस्वी प्रवासाची कहाणी

Rural Entrepreneurship in Maharashtra : नाशिकच्या सटाणा येथील विद्यार्थी यश साळुंके याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 'स्पार्टन' हा स्वदेशी परफ्युम ब्रँड विकसित करून ग्रामीण उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
Spartan Perfume Success Story

Spartan Perfume Success Story

esakal

Updated on

दीर्घकाळ टिकणारा सुगंध, दर्जेदार कच्च्या मालाचा वापर, आधुनिक व आकर्षक पॅकेजिंग, तरुणांना आकर्षित करणारी प्रभावी ब्रँड ओळख आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारी किंमत ही ‘स्पार्टन’ची प्रमुख ताकद ठरली. या वैशिष्ट्यांमुळे ‘स्पार्टन’ परफ्युम अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागला आहे. स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असून, सध्या या ब्रँडच्या पेटंट नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

आजच्या बदलत्या आणि तीव्र स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील तरुणाने शिक्षणासोबत उद्योग उभारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे ही बाब केवळ वैयक्तिक यश न राहता समाजासाठी प्रेरणादायीही ठरते. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचा उद्योग उभारणाऱ्या या यशस्वी तरुणाच्या नावातच ‘यश’ आहे. नाशिक जिल्ह्यामधील लखमापुरातल्या बागलाण तालुक्यातल्या यश आनंदा साळुंके याने विकसित केलेला ‘स्पार्टन’ हा परफ्युमचा ब्रँड ग्रामीण उद्योजकतेचा आशादायी चेहरा ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com