Premium|Women and Travel : तरुण मुलींच्या प्रवासाचा बदलता अर्थ; स्वातंत्र्यापासून आत्मविश्वासापर्यंत

Women, Independence and the New Meaning of Travel : आजच्या तरुण मुलींसाठी प्रवास म्हणजे केवळ फोटो आणि आठवणी नाहीत; स्वतःचे निर्णय घेणे, अनोळखी परिस्थिती हाताळणे, संवाद साधणे आणि स्वतंत्रपणे जगण्याचा आत्मविश्वास मिळवणेही आहे.
Women and Travel

Women and Travel

esakal

Updated on: 

निकिता कातकाडे

आजची मुलगी प्रवासातून फोटो आणि आठवणी घेऊन परत येतेच, पण त्यासोबत ती काहीतरी शिकूनही येते. स्वतः निर्णय घेण्याचं धाडस, अनोळख्या परिस्थितीत स्वतःला सांभाळण्याची क्षमता, नवीन माणसांशी संवाद साधण्याचा आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या सोबतीची सवय. कदाचित याच बदलांमध्ये आजच्या तरुण मुलींच्या प्रवासाचं खरं सौंदर्य दडलंय!

‘फिरायला जायचंय’ असं एखादी मुलगी म्हणते, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर नेमकं काय असतं? एखादं देवस्थान? एखादं निसर्गरम्य ठिकाण? समुद्रकिनारा? डोंगर? की एखाद्या अनोळखी शहराच्या रस्त्यावर स्वतःच्या मनाप्रमाणे, कुणीही घाई-गडबड करत नसताना नुसतं चालणं? कदाचित या प्रश्नांची उत्तरं तिच्या वयानुसार बदलत असतील. कारण पर्यटनाची व्याख्या आता केवळ ‘कुठेतरी जाऊन येणं’ एवढीच राहिलेली नाही. विशेषतः तरुण मुलींसाठी प्रवासाचा अर्थ गेल्या काही वर्षांत खूपच बदललाय. कधी काळी कुटुंबासोबत देवदर्शनाला जाणं, लग्नसमारंभासाठी दुसऱ्या गावाला जाणं किंवा वर्षातून एखाद्या ठिकाणी सहलीला जाणं म्हणजे पर्यटन. आज मात्र स्त्री स्वतःसाठी प्रवास निवडतेय. कुठे जायचं, कुणासोबत जायचं, किती दिवस राहायचं आणि त्या प्रवासातून काय अनुभवायचं हे ती स्वतःच ठरवतेय.

Women and Travel
Premium|Mystery Phone Call : रहस्यमय फोन कॉलने देसाई आजोबांची उडवली झोप
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com