Premium|Marathi Sahitya Sammelan : तरुणाईची भाषा अश्लीलतेपुरती मर्यादित नाही; साहित्य संमेलनही अधिक सर्वसमावेशक हवे

Youth Language and Marathi Sahitya Sammelan : सोशल मीडियावरील तरुणाईची बदलती भाषा, आंदोलनांमधील अभिव्यक्ती आणि साहित्य संमेलनाध्यक्षांची भूमिका, अधिकार व संमेलन अधिक सर्वसमावेशक करण्याची गरज
Marathi Sahitya Sammelan

Marathi Sahitya Sammelan

esakal

Updated on: 

डॉ. तारा भवाळकर

भाषेच्या अनुषंगाने अलीकडे चर्चेत असलेला आणखी एक मुद्दा म्हणजे तरुणाईची भाषा. त्याला पार्श्वभूमी आहे ती गेल्या काही महिन्यांत तरुणाईच्या आंदोलनांदरम्यान वापरल्या गेलेल्या भाषेची. समाज माध्यमांचा वापर करताना युवा पिढी अश्‍लील टीका-टिप्पणी करताना दिसते, शिवीगाळ करताना दिसते. या सर्वाबद्दल टीकेचा सूर उमटतो. पण खरं सांगू का? या नव्या पिढीची भाषा मला दोन अंगांनी महत्त्वाची वाटते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून काम करताना विविध अनुभव आले. खरे सांगायचे, तर निवडणुकीतून काही मी या जन्मी तरी अध्यक्ष झाले नसते. मी उभीच राहिले नसते. महामंडळाने निवड प्रक्रिया राबवली म्हणून मी ९८व्या संमेलनाची अध्यक्ष झाले. वयाच्या या टप्प्यावर मला फारसे बाहेर पडता आले नाही. त्यामुळे निवडीची वेळही योग्य हवी. वयाबरोबरच प्रगल्भतेशी सांगड हवी. समाजापर्यंत पोहोचू शकेल अशी अध्यक्षाची स्थिती हवी. वर्षभरात माझ्यापरीने वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.

सध्या संमेलनावेळी अध्यक्षाची फारशी काही भूमिकाच नसते, असे जाणवते. त्याला कार्यक्रम आयोजित करायचा अधिकार नसतो. मराठवाडा, कोकण, विदर्भ अशा विविध संस्था मिळून महामंडळ तयार होत असते. नानाविध विचारधारांशी जोडलेली मंडळी सुसंगत वक्त्यांची आखणी करतात. अध्यक्षाला यातही फारसे अधिकार नसतात. मला वाटते, संमेलन सर्वसमावेशक हवे, एकांगी नको. अध्यक्षाच्या साहित्यप्रांतातील व्यासंगाचे क्षेत्रही संमेलनात दिसावे. मी लोकसाहित्य संस्कृतीची विद्यार्थिनी. त्याबद्दल मी अपेक्षा मांडल्यानंतर आयोजकांनी स्थानिक लोककलाकारांना व्यासपीठ दिले. राज्यभरातील सर्व शाखांशी संबंधित माझे मित्र होते, त्यामुळे ते शक्य झाले. प्रत्येक अध्यक्षाला कार्यक्रमपत्रिकेत स्थान असावे. त्याच्या-त्याच्या कार्यक्षेत्राचे प्रतिबिंब संमेलनात दिसावे.

Loading content, please wait...