

Youth suicide India
Sakal
दिल्लीतील एका शाळेतल्या अगदी छोट्या मुलाने तिथला त्रास सहन न होऊन घरी येऊन आत्महत्या केली, तर मुंबईत रेल्वे प्रवासात झालेला अपमान सहन न होऊन एका मराठी तरुणाने घरी आल्यावर आत्महत्या केली. धक्का बसावा आणि ‘काय बोलावे आता यावर’ अशा स्वरूपाच्या या घटना आहेत. एका चित्रपटात एक संवाद आहे. त्यात एक बाप म्हणतो, ‘‘जगात सगळ्यात जड ओझे कुठले, तर आपल्या मुलाचे शव खांद्यावर वाहून न्यावे लागावे यासारखे दुःख आणि न सोसणारा भार कुठला नाही.’’ हे अगदी खरे आहे. ज्या मुलाच्या प्रगतीची आणि त्याच्या बहरणाऱ्या आयुष्याची स्वप्ने पाहिलेली असतात त्याचा मृतदेह पाहायला लागणे यासारखे दुसरे दुःख नाही. खरोखर काळीज कुरतडणाऱ्या या बाबी आहेत.