Premium|Zero Vally: आपातानी जमातीची अनोखी शेती पद्धत; झिरो व्हॅलीतील कृषी आणि मत्स्यपालनाचं सहजीवन नेमकं कसं..?

Arunachal Pradesh: बांबूच्या पाइप्स आणि माशांच्या साहाय्याने झिरो व्हॅलीतली नैसर्गिक शेती
ziro valley arunachal pradesh

ziro valley arunachal pradesh

Esakal

Updated on

उत्सव परमार

कुठलंही रासायनिक खत वा कीटकनाशक न वापरता शेती केली जाते. भाताचं प्रत्येक रोप २६ सेंटिमीटर अंतरावर लावलं जातं. जमिनीच्या उतारानुसार पाण्यासाठी वाट तयार केलेली असते. पाण्याच्या वाहण्याची दिशा ठरवण्यासाठी बांबूपासून तयार केलेल्या पाइप्सचा वापर केला जातो. आणि नवल म्हणजे या पाण्यात माशांचा वावर असतो. हे मासे अनावश्यक शेवाळ आणि सूक्ष्मजीव खाऊन वाहतं पाणी शुद्ध ठेवतात. या माशांच्या विष्ठेमुळे भाताच्या रोपांसाठी नैसर्गिकरित्याच खत तयार होतं. कृषी आणि मत्स्यपालनाचं असं सहजीवन क्वचितच पाहायला मिळतं.

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे

सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

- कुसुमाग्रज

काळचं ऊन एखाद्या मऊ मायाळू रजईसारखं अंगावर पांघरतो, तो अरुणाचल प्रदेश! आपल्या देशाचा नकाशा नजरेसमोर आणला, तर अरुणाचल प्रदेश म्हणजे भारताच्या भारदस्त खांद्यांसारखाच वाटावा. अशा अरुणाचलमध्ये दडलेल्या ‘झिरो’ व्हॅलीला कोंदणातल्या हिऱ्याची उपमा दिली तर वावगं ठरणार नाही. तसं बघायला गेलं तर गणितातल्या झीरोशी अजिबातच साधर्म्य नसणारी झिरो व्हॅली तिच्या निसर्गसौंदर्यामुळे आपल्या मनाला मात्र शून्यत्वाच्या अगदी जवळ नेऊन ठेवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com