

Saudi UAE Yemen conflict 2026
sakal
निखिल श्रावगे- आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
सौदी अरेबियाच्या दक्षिणेला असलेल्या येमेन देशातील बंडखोरांवर गेल्या काही आठवड्यांपूर्वी सौदीने हल्ला केला. संयुक्त अरब अमिरातीने या बंडखोर गटाचा पुरस्कार केला होता. त्या गटावर सशस्त्र हल्ला करून सौदीने एक प्रकारे संयुक्त अरब अमिरातीला इशारा दिल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या दोन देशांमधील संबंध तणावाचे रूप घेताना दिसत असून अधूनमधून घडलेल्या घटनांमधून त्याचा प्रत्यय येतो. प.आशियातील सर्वार्थाने समर्थ असणाऱ्या या दोन देशांच्या प्रमुखांमधील ओलावा वरकरणी दिसत असला तरी त्यांच्यात एक सुप्त स्पर्धा सुरू असल्याचे कळून येते. या स्पर्धेचे आणि तिच्या परिणामाचे विश्लेषण करणे गरजेचे ठरते.